सार्वजनिक गणेश उत्सव ,दुबई
सातासमुद्रापार दुबईत यंदा सार्वजनिक गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा
सर्वांनी संघटित व्हावे यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. तेव्हापासुन फक्त महाराष्ट्रात नव्हे, हिंदुस्तानात नव्हे तर हिन्दुस्तानाबाहेर देखील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होऊ लागला. मग यामध्ये दुबई ने तरी का मागे राहायच.
यंदा इंस्पायर इव्हेंटस आणि दुबईतील विविध सामाजिक संघटना, कंपन्या, सांस्कृतिक मंडळे व मित्रपरिवार यांनी दुबई येथे भव्य सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे.
या गणेश उत्सवा दरम्यान भव्य असा बारा ज्योतिर्लिंग विषयक देखावा करण्यात आला आहे जो सर्व दुबई करांचे आकर्षण बनला आहे.
वेस्टझोन प्लाझा हॉटेल अपार्टमेंट्स, कुवैत स्ट्रीट, मनखुल दुबई येथे बुधवार २७ ऑगस्ट रोजी सकाळी गणपती बाप्पाचा श्रीमंत ढोल ताशा पथकाच्या वादनाने आगमन सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर दिवसभरात भजन व सामूहिक गणेश जाप, दुपारची आरती, अथर्वशीर्ष पठण,सांस्कृतिक कार्यक्रम, संध्याकाळची आरती, गणेश भजन व जागरण हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
गुरुवार २८ ऑगस्ट गणेश पूजन आणि आरती, भजन व सामूहिक गणेश जाप व संध्याकाळी भव्य मिरवणूक, गणेश विसर्जन व सांगता आरती करण्यात येणार आहे.
दुबईत दुसरे वर्ष असलेल्या गणेश उत्सवात हजारो भाविक एकत्र येऊन आपल्या गणरायाची सेवा करून एक वेगळा आदर्श संपूर्ण जागा समोर ठेवीत आहेत.
कार्यक्रमाच्या आयोजना साठी सर्वांच्या लाभलेल्या सहकार्यामुळे यंदा भव्य असा गणेश उत्सव सातासमुद्रापार आयोजित केला गेला आहे.


