MPFS दुबई
MPFS ही संस्था मराठी मनांना एकत्र आणून सांस्कृतिक सण व उत्सव, मनोरंजन, कला आणि साहित्य, समाजोपयोगी सेवा यासाठी सतत कार्यरत आहे.
MPFS ने पूर्व परंपरेनुसार सिंधी सेरेमोनियल सेंटर, दुबई येथे २७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला. अष्टविनायकाचा भव्य सुंदर देखावा, तसेच विविध धार्मिक आणि अध्यामिक कार्यक्रम हे या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरले.
MPFS गणेशोत्सव यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी अनेक मान्यवर व्यक्ती व संस्थांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. प्रकर्षाने सिंधी सेरेमोनियल सेंटर व रिगल ग्रुप, लिंक मिडल ईस्ट, अल आदिल ट्रेडिंग, ओम पीके ट्रेडिंग, पुरोहित फूड्स, अर्पण फ्लॉवर्स, क्लासिक केटरिंग, मिटी कॅफे, पंजाबी ढाबा, बॉम्बे बाइट्स, वेज ट्रीट, सिंध पंजाब रेस्टॉरंट, सायबरसिटी ट्रेडिंग, त्रिविक्रम ढोल-ताशा पथक, आशियाना फार्म, ट्रस्ट मेडिकल लॅबोरेटरी, सॅमसोटेक, कंसिस्टन्ट इंजिनिअरिंग, मराठी शाळा, ग्रंथ तुमच्या दारी, अक्षरयात्रा, गीता परिवार, दासबोध वर्ग, FOI- दुबई, एकता-शारजाह, सायन्स इंडिया फोरम-युएई, मराठी सांस्कृतिक मंडळ, हिंदू मंदिर-दुबई यांनी विशेष प्रतिसाद व आवर्जून भेट दिली.
यंदाच्या उत्सवात "स्वर आले जुळूनी", "विष्णु सहस्रनाम ग्रुप", "गणेश भजन मंडळ,शारजाह" यांचे भक्तिपूर्ण प्रस्तुतीकरण तसेच डॉ. संजय जाधव, श्री स्वामी अनुभवानंद आणि श्री धनंजय गोखले यांच्या विविध विषयांवरील मराठी व हिंदीतून झालेल्या प्रवचनांचा आणि व्याख्यानांचा १५०० च्या वर मराठी आणि अमराठी भाविकांनी आस्वाद घेत मनःपूर्वक कौतुक केले.
विघ्नहर्त्याच्या कृपेने, सर्व भाविकांच्या सहकार्याने आणि समिती २०२५ च्या अथक प्रयत्नांमुळे हा उत्सव यशस्वीपणे पार पडला. हा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने मराठी अस्मिता, सामाजिक एकात्मता व महाराष्ट्रीयन संस्कृतीचे एक सशक्त प्रतीक ठरला, असा आनंद कार्याध्यक्ष श्री नरेंद्र भागडीकर व सचिव सौ. श्वेता घालवाडकर यांनी व्यक्त केला. उत्सवाच्या नियोजनात कार्यकारिणी सदस्य सौ. हेमांगी जोशी, सौ. स्मिता लाड, श्री सचिन पोरवाल आणि श्री निखिल जोशी यांचे मोलाचे सहकार्य होते.
गणेशोत्सव दर वर्षी अशाच प्रकारे हर्षोल्लासात साजरा करण्यात येईल, असा विश्वास MPFS संस्थापक समितीने व्यक्त केला.
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!!!


